नवापूर येथील जेलची खिडकी तोडून पळालेल्या 01 आरोपीला : स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या …

Khozmaster
5 Min Read
प्रविण चव्हाण नंदुरबार.
     नवापूर येथील जेलची खिडकी तोडून पळालेल्या 01 आरोपीला, स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या .
     याबाबत अधिक माहिती अशी कि,
  दि. 05 डिसेम्बर रोजी रात्री 01: 15  वाजेच्या सुमारास नवापुर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील एम. आय. डी. सि.कडे जाणाऱ्या रस्त्यावर हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण (वय- 20 ) रा- कुंजखेडा ता- कन्नड जि- औरंगाबाद, इरफान इब्राहिम पठाण (वय35 )  युसुफ असिफ पठाण( वय-22) गौसखॉ हानिफखॉ पठाण( वय34)  रा. ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि- औरंगाबाद, अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण (वय 22) रा कठोरा बाजार ता – भोकरदन जि- जालना हे भागात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतांना एक महिंद्रा कंपनीची ग्रे रंगाची स्कार्पिओ मोटार गाडी (MH -13, N7626) वाहनासह मिळून आले म्हणुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 640/2022 भादंवि क 399 , 402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सकाळी 06: 45 वाजता. अटक करण्यात आली होती . परंतु दि. 05 डिसेंबर रोजी 09.05 वाजेच्या . सुमारास वर नमुद पाच ही आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून त्याद्वारे पलायन केले होते . म्हणून नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 642/2022 भादंवि क 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . अवघ्या दोन तासापूर्वी अटक केलेल्या दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या आरोपीतांनी लॉकअपची खिडकी फोडून पलायन केल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती .
  सदर घटने बाबत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर वारे यांनी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ घटना कळविली . घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधीकारी  सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . आरोपीतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी फरार आरोपीतांचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे 06 वेगवेगळे पथके तयार करुन आरोपीतांचे मुळ गाव असलेले औरंगाबाद , जालना जिल्ह्यात , गुजरात , मध्य प्रदेश राज्यात रवाना करुन केले .
     आरोपीतांचा नवापूर तालुक्यात व तालुक्याच्या सीमावर्ती भागात सर्वत्र शोध मोहिम राबवून नवापूर तालुक्यातील सर्व परिसत पिंजून काढला . दिनांक 05 डिसेम्बर रोजी सायंकाळच्या सुमारास लॉकअप तोडून पळालेला आरोपी  हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण (वय -20) रा . कुंजखेडा ता . कन्नड जि . औरंगाबाद यास गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने पकडण्यात यश आले . परंतु फरार असलेले  04 आरोपीतांना पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते .
   दिनांक 08 डिसेंबर रोजी  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांना गुप्त खबरी मार्फत बातमी मिळाली की , नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेल्या आरोपीतांपैकी एक आरोपी अकीखाँ पठाण हा मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात खडकावाणी गावात त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांना सदर माहिती कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ फरार आरोपीतास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले .
  पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गाव गाठून सुरुवातीला त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता खडकावाणी गावाच्या बाहेर जंगलातील शेतात राहात असल्याची माहिती काढली . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या नातेवाईकाचे खडकावाणी गावाच्या बाहेर जंगलातील शेताच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा रचला , परंतु कुत्रे भुंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून एक इसम पळतांना दिसून आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या इसमाला नाव गाव विचारले असता अकीलखाँ ईसमाईलखाँ पठाण (वय -22 ) रा . कठोरा बाजार ता . भोकरदन जि . जालना असे सांगितल्याने पथकाची खात्री झाली . म्हणून त्यास ताब्यात घेवून नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे .
   तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेले उर्वरीत  3 आरोपीतांना देखील लवकरच बेड्या ठोकण्यात येतील असे,
      पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी सांगितले .
    सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे ,  उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर , सहा . पोलीस निरीक्षक  संदीप पाटील ,  मुकेश तावडे ,  सुनिल पाडवी , विशाल नागरे , मोहन ढमढेरे ,  अभय राजपुत , रामदास माळी यांच्या पथकाने केली आहे .
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *