हिवरखेड येथे गीता जयंती उत्साहात साजरी ,सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न 

Khozmaster
1 Min Read
हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी येथे भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गीता जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्यl अध्यक्षस्थानी सेंट पॉल  अकॅडमीचे प्राचार्य प्राध्यापक श्री चंद्रकांतजी तिवारी सर व उपप्राचार्य निमिता गांधी मॅडम उपस्थित होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक ब्रम्हदेवजी हागे सर उपस्थित होत्या. श्रीकृष्णाच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेचे प्राचार्य चंद्रकांतजी तिवारी सर यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  केले. इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी गीतेतील संस्कृत भाषेमधले श्लोक पठण करून त्याचा अर्थ उपस्थित पाहुण्या समोर सादर केले तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गीतेतील उपदेशांवर भाषणे देऊन गीतेतील सार सांगण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या जीवनावरील नाटिका सुद्धा सादर केली. त्याचबरोबर नृत्य,गायन सादर करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रम्हदेवजी हागे सर यांनी आपले विचार व्यक्त केले व अध्यक्षांच्या परवानगीने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. नवनीतजी लखोटीया सर ,संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरंजी डागा सर संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर यांनी शुभेच्छा दिल्या.
0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *