आज मानवी हक्क दिनाचे आयोजन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
मानवी हक्क दिनाचे औचित्याने शनिवार 10 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हा प्रशासन व एन.टी. व्ही.एस. विधी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री व विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.समाजाच्या विविध घटकांमध्ये मानवी हक्कांविषयक शिक्षण वाढीस लागण्यासाठी व सर्वसामान्य लोकांमध्ये मानवी हक्काबाबत जनजागृती व कायद्याची माहिती तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.एन.टी.व्ही.एस.विधी महाविद्यालय, खोडाई माता रोड, नंदुरबार येथे सकाळी 10 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री, एन.टी.व्ही.एस. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चौधरी यांनी केले आहे.
Users Today : 8