वसई विरार महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागात सॅनेटरी नॅपकीन वाटप घोटाळ्याची चौकशी करा…

Khozmaster
2 Min Read
रूचिता अमित नाईक,अध्यक्षा समेळगाव कॉंग्रेस
वसई विरार शहर महानगरपालिका महिला व बाल- कल्याण विभागामार्फत महापालिकेच्या हद्दितील जिल्हा-परिषद शाळेतील विद्यार्थिनींना सॅनेटरी- नॅपकीन वाटप करण्यात येत असून काही शाळांना सॅनेटरी- नॅपकीन मिळत नसल्याने या घोटाळ्याची चौकशी करून निविदा घेणाऱ्या कंत्राटदारावर  संबधितांवर कारवाई करण्याबाबत कॉंग्रेस पक्षाची मागणी ..रूचिता अमित नाईक अध्यक्षा समेळगाव कॉंग्रेस वसई-विरार शहर महानगरपालिका 2015 पासुन महिला व बाल- कल्याण विभागामार्फत महापालिका हद्दिच्या जिल्हा- परिषद शाळेतील सर्व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटूंबातील विद्यार्थिनींना सॅनेटरी- नॅपकीन वाटप करण्यात येत आहे. यासाठी महापालिका 120 शाळेतील 4800 विद्यार्थीनींना मोफत सॅनेटरी- नॅपकीन वाटप करत असतांना वर्षाकाठी 34लाख 56 हजार रूपये खर्च करून कंत्राटदारास निधी उपलब्ध करून देत आहे.
पण काही शाळांना अजुन पर्यंत सॅनेटरी नॅपकीन मिळाले नाही. अशी धक्कादायकबाब समोर आली आहे. मर्जीतील ठेकेदाराला हे काम देता यावे यासाठी
तसेच 2 रूपयांना मिळणारे सॅनेटरी नॅपकीन हे महापालिका 4.16  पैसे या दुप्पट भावात खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अंदाजीत खर्चापेक्षा 50 टक्के दर जास्त लावले असल्याने अंदाजीत खर्च जाणीवपूर्वक ठेवल्याचे दिसत आहे.
या निविदेत प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाला असल्याचा संशय या प्रकारावरून निर्माण होत आहे. निविदा काढुन पालिकेची तिजोरी लुटण्याचा डाव दिसतो आहे.यासंदर्भात निविदेची व काही शाळांना सॅनेटरी नॅपकीन मिळत नसल्याची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि संबंधित दोषी आढळणाऱ्या या सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी *समेळगाव कॉंग्रेस अध्यक्षा रूचिता अमित नाईक* यांनी महापालिका आयुक्तांकडे केली…
0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *