पुन्हा अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा गजराज चालला

Khozmaster
1 Min Read
स्वप्नील गणगणे
मुर्तीजापुर शहरातील  आठवडी बाजार उड्डाण पूल मार्गावरील रहदारीत अडथळा करणाऱ्यांवर अतिक्रमण पथकाची आक्रमक कारवाई चार चाकी गाड्या ठेले दुकानासमोर बांधलेले ओटे पक्या स्वरूपाचे बांधण्यात आलेल्या ओटी अतिक्रमण हटाव पथकाने जमीन दोस्त केले विशेषत मटन मछली विक्रीते यांना वारंवार सांगूनही आठवडी बाजाराच्या रस्त्यावर आपली दुकाने थाटून बसतात त्यांना आठवडी बाजारात मुबलक जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही स्वतःच्या मनमर्जीने इतरत्र बसून त्यांनी दुकानदारी चालवीत होते त्यामुळे नगर प्रशासन महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मदतीने आज शुक्रवार रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी त्यांचे पूर्णतः अतिक्रमण जमीनदोष करण्यात आले यावेळी अतिक्रमण धारकांनी पथकांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत अतिक्रमण पथकाने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू ठेवली अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढले उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते नगरपरिषद मुख्य अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी सुप्रिया टवलारे सह नगरपरिषद चे बांधकाम विभाग आरोग्य विभाग सह समस्त कर्मचारी व पोलीस प्रशासन यांनी अतिक्रमण मोहीम फतेह केली तसेच बस स्टँडच्या बाजूला असलेले मटण विक्रेते अकोला नाक्यावरील व कंजरा टी पॉइंट  वर असलेले मटण विक्रेते सर्व आठवडी बाजारात एका मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो असे जनसामान्यातून बोलल्या जात आहे.
0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *