समर्थ कृषी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयक कार्यशाळा संपन्न..

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
 डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयक जागृती व्हावी या उद्देशाने स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन नुकतेच संपन्न झाले. या एक दिवसीय कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे तर  प्रमुख मार्गदर्शक म्हणून गजानन पाटील कृषी विभागीय प्रशासकीय अधिकारी नाशिक हे होते.        याप्रसंगी गजानन पाटील यांनी स्पर्धा परीक्षा संबंधी सविस्तर माहिती देत कशाप्रकारे स्पर्धा परीक्षेची तयारी करावी तसेच स्पर्धा परीक्षा बद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेले समज गैरसमज यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या शंकेचे निरसन केले तसेच कुठल्याही परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाच्या माध्यमातून कशाप्रकारे तयार व्हावे याबद्दल देखील सांगितले. सोबतच कृषी क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधी बाबत देखील विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा देवानंद नागरे तर उपस्थितांचे आभार मोहजीतसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा किरण ठाकरे, प्रा विजय पवार व विद्यार्थी उपस्थित होते.
0 9 3 7 4 4
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *