महाराष्ट्र तैलिक महासभा नागपूर यांची स्वामी विवेकानंद महाविद्यालय व श्री सरस्वती इंग्लिश स्कूल अंत्रज येथे सदिच्छा भेट
शाळा महाविद्यालयाचा परिसर बघून आनंद झाला- केंद्रप्रमुख हरिश्चंद्र दाहगणे पं. स उमरेड, नागपूर
प्रतिनीधी रवि मगर बुलढाणा सामजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष युवा आघाडी मा.श्री. जगदिशजी वैद्य, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेश काळबांडे , ते नागपूर वरून चार दिवसीय बुलढाणा येथे संत नगरी शेगाव येथे दर्शनासाठी आले असता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा विभागीय संघटक जयेश भाऊ भिसे , व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष निळूभाऊ सोनटक्के यांनी सरस्वती इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय अंत्रज तथा सहकार शक्ती अर्बन बँकेचे सर्वेसर्वा श्रीकांतजी चोपडे यांच्या शाळेला भेट दिली संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र तैलिक महासंघ नागपूर विभागीय अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष युवा आघाडी नागपूर यांनी श्रीकांत चोपडे यांच्या विषयी व संस्थेविषयी मनोगत व्यक्त केले.मागील बारा वर्षे संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील मुलांना इंग्रजी भाषेत बोलता यावा , व प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं हा उद्देश मनामध्ये ठेवून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं . यासाठी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व हितासाठी संस्थेअंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धा परीक्षेच्या विविध संधी शिक्षणाच्या माध्यमातून मिळणार आहे . छोटसं लावलेलं शिक्षणाचा रोपट भविष्यात फार मोठ वृक्ष होणार आहे . स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना/विद्यार्थिनीं ना या शैक्षणिक संस्थेच्या रूपातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. . श्री. हरिश्चंद्रजी दहाघाणे, (केंद्रप्रमुख) पं.स.उमरेड जि. प.नागपूर म्हणून गेल्या मागील पाच वर्षापासून ते केंद्रप्रमुख कार्यरत असून सेवा देत आहेत.विविध संस्थांच्या भेटीदरम्यान त्यांनी सरस्वती इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय अंत्रज येथील परिसर बघून त्यांना व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंद झाला. स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील विद्यालयाला संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व संस्थेला पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा व पाहुण्यांचा शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित श्री. गणेशजी वासुरकर, श्री. ओमप्रकाशजी आगाशे, श्री. चंद्रशेखरजी मुंगले, श्री. दिगांबरजी चौधरी ,श्री. राहुलजी भुसारी,निळूभाऊ सोनटक्के, जयेश भिसे, श्रीकांत चोपडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय आराख प्रा. कडूबा पैठणे तांत्रिक सहाय्यक शुभांगी पालीवाल , शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री चोपडे, मॅडम व शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 23