हिंगोली
जिल्ह्यातील वसमत येथील बहिजी स्मारक महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. करुणा प्रताप देशमुख (पतंगे) ह्या स्वामुक्टा संघटने तर्फे स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड सिनेट 2022 च्या निवडणुकीत महिला प्रवर्गातून उभ्या होल्या. त्यांच्यासह एकूण पाच महिला सिनेट निवडणूकीसाठी होत्या. त्यापैकी प्रोफेसर डॉ. करुणा देशमुख यांनी सर्वाधिक अकराशे सत्ताविस (1127) मताधिक्य घेऊन यश संपादन केले. स्वामुक्टा संघटने अंतर्गत प्राध्यपकांच्या विविध प्रश्नासाठी विद्यापिठ, सहसंचालक कार्यालय या ठिकाणी विविध आंदोलनात सक्रीय सहभागी राहून निवेदन देवून प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.तसेच निरभिड, अभ्यासू आत्मविश्वासाच्या बळावर प्रचार मोहिमे अंतर्गत आपल्या वक्तव्य शैलीतून प्रत्येक महाविद्यालयात भेटी देवून संघटनेची भूमिका मांडली. त्याच बरोबर त्यांचा स्वतःची विशेष बाब म्हणजे त्यांनी अमेरिका व पोलंड सारख्या देशात जावून अंतरराष्ट्रीय परिषदे मध्ये संशोधनात्मक पेपर वाचन केले, महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. तसेच त्यांना विद्यापिठाचा बेस्ट टिचर आवर्ड देखील मिळालेला आहे. त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करुन प्राध्यापक मतदार बंधू आणि भगोनीनी बहुमताने प्रो. डॉ. करुणा प्रताप देशमुख (पतंगे) यांना विजय केले.
तसेच या स्वामुक्टा संघटनेचे प्रा. डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. विजय भोपाळे, डॉ. विष्णु पवार, प्रा.डॉ. दिलीप पाईकराव व विद्या परिषदेवर डॉ. डी. एन. मोरे, डॉ. एल.पी. शिंदे, डॉ. भोसले इत्यादीसह विजय झाले. यासाठी महाविद्यालयीन स्वामुक्टा कार्यकारणी प्रा. डॉ. सुभाष क्षीरसागर, प्रा. डॉ. प्रदीप जाधव, प्रा.डॉ. नरसिंग पिंपरने व हिंगोली जिल्हा स्वामुक्टा कार्यकारणीचे प्रा. डॉ. सुधिर वाघ, प्रा. डॉ. आनंद भट्ट, प्रा.डॉ. बी. एस. साळवे, प्रा. डॉ. काशिनाथ चव्हाण, प्रा. डॉ. माणिक ढोकळे, प्रा. डॉ. डी. एम. कदम आदी लोकांनी विजयाकरीता मोलाचे परिश्रम घेतले.
प्रो. डॉ. करुणा प्रताप देशमुख (पतंगे), यांच्या विजया बद्दल संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर ,उपाध्यक्ष- मुंजाजीराव जाधव, सचिव- पंडीतराव देशमुख, उमाकांतराव शिंदे, प्राचार्य डॉ. प्रशांत गवळी, शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपालराव सरनायक, प्रो.अमोल लाटे, डॉक्टर संग्राम मोरे ,प्रभाकर जाधव, गोपाल मोघे, भुरे,उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक वृंद यांनी त्यांचं अभिनंदन केले.
Users Today : 24