मोबाईल चोरणारा एका इसमास , नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेडया, गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत..
प्रविण चव्हाण.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 20 ते 21 नोव्हेंबर रोजी रात्री 11: 00 वाजेच्या . सुमारास धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील उमराणी बु. येथील दारासिंग गोमच्या पावरा यांचे घरातून 3000/- रु.. किमतीचा मोबाईल अज्ञात आरोपीतांनी चोरुन नेली म्हणून धडगांव पोलीस ठाणे येथे 173/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.दिनांक 09 डिसेंबर 2022 रोजी पो.निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील काकावाडी येथे एक इसम बील नसलेला महागडा मोबाईल कमी किमतीत विकत आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील काकावाडी परिसरात एक संशयीत इसम मिळून आल्याने. त्याचे नाव, समिर अकिल पठाण (वय-22) रा. काकावाडी, धडगांव जि. नंदुरबार असे सांगितले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोबाईल बाबत विचारपूस केली असता.त्याने सुमारे 15 ते 20 दिवसापूर्वी उमराणी बु. येथे रात्रीच्या वेळी एका घरातून सदरचा मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.त्यबाबत धडगांव पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता धडगांव पोलीस ठाणे येथे 173/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.समिर अकिल पठाण (वय-22) याचे ताब्यातून गुन्ह्यातील 3000/- रुपये किमंतीचा मोबाईल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी धडगांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक. संदीप पाटील, पो. नाईक पुरुषोत्तम सोनार दिपक न्हावी, किरण मोरे यांच्या पथकाने केली आहे.
Users Today : 23