प्रथम नगराध्यक्ष स्व.वासुदेव बेहेरे चौकाचे नामकरण : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,

Khozmaster
1 Min Read
नंदुरबारातील गल्लीवस्त्यांची जाती वाचक नावे हटविणार.
प्रविण चव्हाण
नंदुरबार  :-सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार नंदुरबार शहरातील जातिवाचक गल्लीवस्त्या,मोहल्यांची नावे हटवून समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संत,महात्म्य व थोर पुरुषांची नावे देण्यात येतील असे प्रतिपादन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष स्व.वासुदेव महादेव बेहेरे यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घरा जवळील चौकाचे स्व.वासुदेव महादेव बेहेरे नामकरण करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार रघुवंशी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी प्रथम नगराध्यक्ष स्व. वासुदेव बेहेरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सरिता बापट यांनी केले.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,१० वर्षांपूर्वी पालिकेने माजी नगराध्यक्षांची नावे शहरातील रस्त्यांना देण्याच्या निर्णय घेतलेला होता. रामचंद्र माहेश्वरी,वेडू गोविंदा राजपूत यांची नावे रस्त्यांना दिली आहेत. परंतु,गतकाळात नामकरणास खंड पडला. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत २४ डिसेंबर पर्यंत असून, या कालावधीत शक्य असल्यास माजी नगराध्यक्षा यांच्या सन्मानार्थ रस्त्यांना नावे देण्यात येतील.
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक परवेज खान,विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर,नगरसेवक जगन्नाथ माळी,प्रेम सोनार,संचीती पाटणकर,धनंजय पाटणकर,सरिता बापट,धनंजय बापट,स्मिता गोगटे, दत्ता गोगटे,प्रज्ञाली दाते, उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतसाठी प्रसाद नारायण बेहेरे,निनाद बेहेरे,सायली बेहेरे,संजय फुलंब्रिकर यांनी प्रयत्न केले.
0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *