प्रविण चव्हाण नंदुरबार
नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरातुन गांजाची वाहतूक करणाऱ्या व विक्री करणाऱ्या त्यांच्याकडून 03 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला .
त्याचा कडून 48 हजार रुपये किंमतचा गांजा ऐवज जप्त करण्यात आला आहे .
याप्रकरणी दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सागर रविंद्र श्रीष्ट ( 19, रा. गौतम नगर रेल्वे कॉलनी ) नंदुरबार.
भुऱ्या उर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे ( वय 23, रा. सरोज नगर ) नंदुरबार. असे अटक केलेल्याचे नाव आहे .
अधिक माहिती अशी कि,
नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून, गांजा , अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक लागवड करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचे वर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक , विक्री व लागवड यांचे वर कारवाई करणे साठी त्याबाबतची माहिती घेत होते .
11 डिसेंबर रोजी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त खबरी मार्फत नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला एक इसम बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली .
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले . पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व पथकाने नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचला .
11 डिसेंबर रोजी सायंकाळी 16.45 वाजेचा . सुमारास नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरातून कंजरवाडा भागाकडे पायी एक इसम जातांना दिसला , साधारण 19 ते 20 वर्ष वयाचा अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला , म्हणून पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचा पथकाला संशय आल्याने त्यास थांबवून त्याचे नाव विचारले असता सागर रविंद्र श्रीष्ट (वय19 रा . गौतम नगर , रेल्वे कॉलनी , नंदुरबार) असे सांगितले .
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे पथकाने सागर श्रीष्ट याच्या पाठीवर असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्यात खाकी रंगाचे प्लॅस्टीक मध्ये गुंडाळलेले पाच पाकीट आढळून आले .
प्लॅस्टीक चे पाकीट उघडून पाहिले असता त्यात 48, हजार रुपये किमतीचा 03 किलो 200 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा मिळुन आल्याने गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करून सागर रविंद्र श्रीष्ट ( वय 19 रा . गौतम नगर , रेल्वे कॉलनी , नंदुरबार) व मुद्देमाल ताब्यात घेतला .
तसेच ताब्यात घेण्यात आलेला सागर रविंद्र श्रीष्ट यास गांजा बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गांजा भु – या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे , ( 23 , रा . सरोजनगर , नंदुरबार) याचे कडून घेतल्याचे सांगीतले भु – या याचा शोध घेतला असता तो सरोजनगर भागात मिळुन आल्याने आरोपी. सागर रविंद्र श्रीष्ट, व
भु – या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे , नंदुरबार यांचेविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 771/2022 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 ( क ) , 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस उप निरीक्षक सागर आहेर , पोलीस हवालदार संदीप गोसावी , जगदीश पवार , पोलीस नाईक भटू धनगर , स्वप्निल शिरसाठ , बलविंद्र ईशी , स्वप्निल पगारे पोलीस अंमलदार हेमंत बारी , योगेश जाधव , इम्रान खाटीक , युवराज राठोड , विशाल मराठे , दिनेश चव्हाण , कल्पेश रामटके यांचे पथकाने केली असुन,
पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .
Users Today : 0