खा. शरदचंद्रजी पवार वाढदिवसानिमित्त दुग्घाभिषेक महादेवाला

Khozmaster
1 Min Read
(स्वप्नील गणगणे ) मुर्तीजापुर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते खा शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यांना उदंड आयुष्य साठी शहरातील समता नगर स्थित महादेवाला दुग्घाभिषेक करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रेपाडखेड रोडवरील श्री पुंडलिक महाराज गौरक्षण येथे जनावरांना चारा व ढेप देण्यात आली व त्यानंतर तिथेच वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले यावेळी प्रदेश संघटक सचिव रवी राठी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे विधानसभा प्रमुख सागर कोरडे शहराध्यक्ष राम कोरडे निजामभाई इब्राहिम भाई ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विष्णू लोडम ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल शिरभाते अमोल लोकरे अ, जावेद मुकेश अटल आनंद पवार अमोल शिंदे रवी मारकड दीपराज बैतलवार निखिल ठाकरे तुषार दाभाडे सागर निचळ गजानन डहाळे संतोष चऱ्हाटे अक्षय मोलोदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *