सोयगाव दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या तरी कुठे….

Khozmaster
2 Min Read
ग्रामीण भागात चर्चा : बँका , एटीएममधूनही दर्शन नाही;प्रा.जीवन कोलते
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा करीत जुन्या पाचशे , हजारांच्या नोटा चलनातून बाद ठरवत दोन हजारांची नवी नोट चलनात आणली . या घटनेला सहा वर्षांचा कालावधी लोटला . सुरुवातीच्या काळात दोन हजारांची नोट चांगल्या प्रकारे चलनात होती . सर्वसाधारणपणे इतर नोटा चलनात दिसत असल्या तरी ग्रामीण भागात दोन हजारांची नोट चलनातून गायब झाली आहे . त्यामुळे दोन हजारांच्या नोटा गेल्या तरी कुठे ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे . दोन हजारांची नोट चलनात आल्यानंतर या नोटासुद्धा चलनात मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या . मात्र मागील अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागात दैनंदिन व्यवहारात दोन हजारांच्या नोटा गायब झाल्या आहेत . त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी येत आहेत . बँकेच्या दैनंदिन व्यवहारातसुद्धा ग्राहकांना ५०० , २०० , १०० , ५० रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत . दोन हजारांची नोट बाजारात दिसत नसल्यामुळे या नोटा बाजारातून गेल्या तरी कुठे ? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे . चलनातून गायब झालेल्या या नोटा एटीएममधूनही दिसेनाशा झाल्या आहेत . ग्रामीण भागातील अनेकांनी दोन हजारांची नोट काही महिन्यांपासून बघितली नसल्याचे सांगितले जाते . तर व्यापारी वर्गालाही दोन हजारांची नोट व्यवहारात येत नसल्याने व्यवहार करताना अडचणी येत आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाबाजार थांबविण्याच्या उद्देशाने नोटबंदी घोषित केली होती . या निर्णयाविरोधात तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला . यामुळे अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला होता . मात्र आता चलनातूनच दोन हजारांची नोट गायब झाल्यामुळे सदर नोट गेली कुठे ? याबाबत ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले आहे.
एटीएममधूनही हद्दपार केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या होत्या . त्यावेळी दोन हजार रुपयांची नोट चलनात दाखल करण्यात आली होती . मात्र अवघ्या सहा वर्षांच्या कालावधीतच दोन हजारांची नोट चलनातून गायब झाली आहे . विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बँक व एटीएममधूनही ही नोट हद्दपार झाल्याचे चित्र आहे .
प्रा.जीवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते)सावळदबारा ता सोयगाव
0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *