प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे खा . डॉ . हिना गावित तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ . सुप्रिया गावित व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले . दि . १० डिसेंम्बर २०२२ रोजी रोझवा पुनर्वसन ता.तळोदा येथे जल जिवन मिशन अंतर्गत १ कोटी ४३ लाख रुपयांच्या योजनेचा शुभारंभ खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित ह्या उपस्थित होत्या . तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
यावेळी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा , जि.प.सदस्य रितेश वळवी , मंडाई फौंडेशनचे अध्यक्ष अमोल भारती , सरपंच सरदार पाडवी , उपसरपंच उदेसिंग तडवी , दिनेश पावरा , कैलास पाडवी , छगन कोठारी , पंडित पावरा , रेल्या तडवी , महेश पाटील , पाणीपुरवठा अभियंता सागर पवार , ग्रामसेवक दिलीप खोब्रागडे , आपसिंग पाडवी , भूसरा वसावे , रमेश वसावे व गावकरी उपस्थित होते . यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित समुदयास दिली . तर खा.डॉ. हिना गावित यांनी जल जिवन मिशन योजनेची इथंभूत माहिती व केंद्र सरकारच्या विविध योजना या विषयी आपल्या मनोगतातून विषद केल्या.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाज्या पावरा यांनी केले . तर आभार उदेसिंग तडवी यांनी मानले .
Users Today : 0