क्रॉपसॅप अंतर्गत मौजे अडगाव बु. येथे तूर पिकाची शेतीशाळा

Khozmaster
1 Min Read

रितेश कुमार टीलावत हिवरखेड प्रतिनिधी

कीड व रोग सर्वेक्षण क्रॉपसॅप  अंतर्गत तूर या पिकाच्या शेतीशाळा वर्ग तालुका कृषि अधिकारी श्री नरेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेतकरी श्री. विनोद राम आप्पा एकघरे मौजे अडगाव बु. यांच्या शेतात संपन्न झाला. तूर हे पीक सद्या काही भागांमध्ये फुलोरा अवस्थेत व काही भागामध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून या अवस्थेमध्ये पिकामध्ये सर्वाधिक पाने गुंडाळणारी अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्या अनुषंगाने सदर ची शेतीशाळा ही तूर पिकावरील ही एकात्मिक कीड नियंत्रण या विषयावर घेण्यात आली. सुरुवातीला शेतकऱ्यांना दोन गटामधे विभागणी करून पिकाच्या सध्यस्थितीची निरीक्षणे घेण्यात आली त्या नंतर त्या अनुषंगाने चर्चा झाली यामधे प्रामुख्याने तुरीवरील पाने गुंडाळनारी शेंगा पोखरणारी अळी त्यांचे जीवन चक्र व आर्थिक नुकसान पातळी व त्या अनुषंगाने करावयाच्या एकात्मिक किड नियंत्रनाच्या बाबी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सांघिक खेळ घेण्यात आला सदर शेती शाळेस श्री. एस. पी. राजनकर, श्री. एम. व्हि. सारभुकन, श्री. एम. ए. इंगळे , श्री. पी. डब्ल्यू. पेठे, श्री. व्ही. बी. बिहाडे, कृषी सहायक व मोठ्या प्रमाणात गावातील शेतकरी उपस्थित होते.

0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *