चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत डोंगर खंडाळा येथे रास्ता रोको

Khozmaster
2 Min Read
प्रतिनीधी रवि मगर
रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको, तीस मिनिटे वाहतूक ठप्प
बंगला फाटा ते उंद्री रस्त्यावर डोंगर खंडाळा येथे तीस मिनिटे वाहतूक ठप्प बुलढाणा – पैठण येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा एकदा नागरिकांमध्ये वाद निर्माण होईल असे वक्तव्य केले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून गावातील नागरिकांनी मोर्चा काढत स्थानिक बस स्टँड चौकात येऊन रास्ता रोको करीत त्यांच्या प्रतिमेला चपलाच्या हार घालून यांचा पुतळा जाळण्यात आला.  त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी पोलीस प्रशासन घटनास्थळी येऊन निषेध करणाऱ्यांना समजून सांगण्यात आले समजून सांगितल्यानंतर निषेध करणाऱ्यांनी बाजूला होऊन रास्ता मोकळा करून दिला. व लेखी स्वरूपाचा निवेदन ठाणेदार यांना देऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर ठप्प झालेली वाहतूक  सुरळीत करण्यात आली. यावेळी  चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची निवेदनात मागणी केली.यावेळी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख, सहाय्यक फौजदार नारायण तायडे, गोपनीय पो.कॉ. दुर्गासिंग ठाकूर, म.पो. हे. कॉ. मंगला गायकवाड, व रायटर बोरसे हजर होते.निवेदनामध्ये अमोल येशबा भंडारे, शरद लक्ष्मण सपकाळ, शरद गोविंदा मिसाळ, राजू प्रल्हाद पवार, निंबाजी शामराव भोंडे, तुळशीराम पिराजी डोंगरे, संजय रामचंद्र काकडे, सुनिता गजानन वानखेडे, गुंफाबाई नामदेव खरात, वर्षा गुलाबराव कांबळे, प्रमोद शेषराव खरात, शरद भास्कर वानखेडे, परमेश्वर बारीकराव भंडारे, गजानन परसराम खरात व इतर यांनी सह्या केल्या आहे.
0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *