दिव्यांगांना कृत्रिम अंग व कॅलिबर वाटप कार्यक्रम संपन्न

Khozmaster
2 Min Read
मुर्तिजापुर (भुषण महाजन)
मा.आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे याचे वाढदिवसानिमित्ताने दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी संत गजानन महाराज बहुद्देशिय संस्था मूर्तिजापूर व नारायण सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नारायण सेवा संस्थान अध्यक्ष श्री मानव जी व सेवक प्रशांतजी यांच्या सहकार्याने सिंधी समाज भवन, मेन रोड, मूर्तिजापूर येथे दिव्यांगांना कृत्रिम अंग व कॅलिबर मोजमाप  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्या शिबिरामध्ये पात्र ठरलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अंग व कॅलिबर वाटप कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 14 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बस स्टँड मागे, मूर्तिजापूर येथे करण्यात आले होते. यावेळी एकूण 83 दिव्यांग बांधवांना कृत्रिम अंग कलीबर वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मा.श्री भैयासाहेब तिडके, तसेच माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे,  उपविभागीय अधिकारी मा.अभयसिंह मोहिते साहेब, तहसीलदार मा.प्रदीप पवार साहेब, मुख्याधिकारी न.प. श्रीमती सुप्रिया टवलारे, नारायण सेवा संस्था तर्फे श्री लढाजी, श्री रावसाहेब कांबे, श्री मारोतीआप्पा पिंपळे, श्री पुरुषोत्तम डागा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन श्री अशोक भावनानि यांनी केले. यावेळी भुषण हिम्मतराव कोकाटे भाजपा तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर, रितेश रामकुमारजी सबाजकर भाजपा शहराध्यक्ष मूर्तिजापूर, सचिन सुरेशबाप्पू देशमुख भाजयुमो जिल्हाध्यक्ष अकोला, पप्पु पाटील मुळे भाजयुमो तालुकाध्यक्ष मूर्तिजापूर, हर्षल साबळे भाजयुमो शहराध्यक्ष मूर्तिजापूर, तसेच संत गजानन महाराज बहुद्देशिय संस्था चे सौ.नूतनताई हरीष पिंपळे, संतोष भांडे, सुनील लशुवाणी, डॉ. गोसावी, प्रशांत हजारी, योगेश फुरसुले यांची व विनायक वारे, कमलाकर गावंडे, भारत जेठवाणी, लखन अरोरा, राम जोशी, कोमल तायडे, अविनाश यावले, छत्रपती साबळे, संदीप जळमकर, अमोल प्रजापती, रोहित अव्वालवार, निलेश वानखडे, गोपाल दायमा, विलास सावळे, निकी महाजन, दिवाकर सोनोने, दिनेश श्रीवास, जितू चौबे, सुनील डाहेलकर, ज्ञानेश्वर गडवाले, विनोद नाकट, अमन महल्ले, सुधीर दुबे, योगेश फुरसुले, योगेश्वर तडके, आपात्कालीन पथकाचे सेनापती, बादशाह यांची तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
0 9 3 7 4 9
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *