शेतातील पाण्याची मोटार चोरीच्या गुन्ह्यांतील 02 अट्टल गुन्हेगार, स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

Khozmaster
5 Min Read
प्रविण चव्हाण
 नंदुरबार -:  शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,  दोघांकडून  2 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
        सविस्तर माहिती अशी कि,
मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार व इतर शेती साहित्य चोरीच्या घटनांबाबत  पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच शेतकरी बांधव स्वत: देखील त्यांना भेटत होते. पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्द्तीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते. पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणेे आवाहन होते. त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  खेडकर यांनी  जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची  माहिती घेवुन रेकॉर्ड वरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेल मधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.
 11  ते 12 डिसेम्बर  दरम्यान उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील आडची गावातील आमराळे शिवारातील  विश्वनाथ शिवनाथ वळवी यांचे शेतातील विहीरी मधुन 10 हजार रुपये किमतीची एक पाण्याची मोटार अज्ञात आरोपीतांनी चोरुन नेली म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे 405/2022 भादंवि क 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    14 डिसेंबर  2022 रोजी  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त खबरी मार्फत बातमी मिळाली की, शेतातील पाण्याची मोटार चोरणारे करणसिंग वळवी, रा.लहान राजमोही ता. अक्कलकुवा याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेली असून चोरी केलेल्या पाण्याच्या मोटार ते नंदुरबार येथे ऍ़पेरिक्षा मध्ये भरून विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाल्याने नंदुरबार पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांना कळवून, बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरतील नवापूर चौफुली परिसरात सापळा रचला. दुपारी 03 :00 वाजेच्या सुमारास नवापूर रोड कडून नंदुरबार कडे एक संशयीत ऍ़पेरिक्षा येतांना दिसली. पथकाने ऍ़पेरिक्षा चालकास हाताचा इशारा करून थांबविली. ऍ़पेरिक्षा मध्ये असलेल्या दोन इसमांना त्यांचे नाव  विचारले असता चालक करणसिंग, रविदास वळवी, (वय-22  रा. लहान राजमोही, ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार)
 जय नेहरू पाडवी, (वय-26, रा.वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार) असे सांगितले. ऍ़पे रिक्षाची पाहणी केली असता, रिक्षाच्या मागील बाजूला प्लास्टीकच्या गोण्या दिसून आल्या. प्लास्टीकच्या गोण्यांबाबत  रविदास वळवी, जय पाडवी, यांना विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देवू लागले. म्हणून पथकाने त्या गोण्या उघडून पाहिले असता त्यात पाण्याच्या मोटारी दिसून आल्या.  म्हणून पथकाने दोन्ही संशयीत इसमांना अधिक चौकशीकामी स्थानिक गुन्हे शाखा येथे आणले.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयीत इसमांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी मागील काही काळात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका, तळोदा, अक्कलकुवा इत्यादी परिसरातून गावाच्या शेतांमधील विहीर व बोअर वेल मधून पाण्याच्या मोटार चोरुन त्या विक्री करण्यासाठी नंदुरबार येथे येत असल्याचे सांगितले. मिळून आलेल्या पाण्याच्या मोटारी बाबत नंदुरबार जिल्ह्यातील उपनगर पोलीस ठाणे, अक्कलकुवा पोलीस ठाणे, तळोदा पोलीस ठाणे येथील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता तेथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयीत इसमांच्या ताब्यातून 81 हजार रुपये किमतीच्या 06 पाण्याच्या मोटारी व 2 लाख रुपये किमतीची चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी ऍ़पेरिक्षा क्र. (GJ-04 AT-4879 )असा एकुण 2 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे,
असे नंदुरबार पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील सांगितले. 
ही कामगिरी, पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख, पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक  संदीप पाटील,  मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, सुनिल पाडवी, विशाल नागरे, बापू बागुल, मोहन ढमढेरेे,  शोएब शेख, रामेश्वर चव्हाण यांच्या पथका
0 9 4 7 1 1
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *