नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते निर्भया पथकातील पोलीस अंमलदारांचा सत्कार…

Khozmaster
3 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: जिल्ह्यातील प्रत्येक महिला , विद्यार्थिनीं आपल्या भागात रोडरोमिओ किंवा घराबाहेर कोणी त्रास देत असेल तर आता घाबरून जाऊ नका .
       नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा पोलीस दला तर्फे सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया  पथक सज्ज करण्यात आले आहे .
       पोलीस अधीक्षक   पी.आर.पाटील यांचे हस्ते, पुष्पगुच्छ देवून, सत्कार करण्यात आला.
त्यावेळी निर्भया पथकातील पोलीस अंमलदारांचा  चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले.
शाळा, महाविद्यालय, खाजगी क्लासेस, गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड थांबविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा पोलीस दला तर्फे सर्व पोलीस ठाणे स्तरावर निर्भया पथक स्थापन करण्यात आलेले आहे.
  शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या आणि भरण्याच्यावेळी किंवा गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात येत असते. ताकीद दिल्या नंतर ही त्या युवकांनी अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येत असते, परंतु त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्याचे विरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई संबंधीत पोलीस ठाण्याकडून करण्यात येते.
 14 डिसेंबर   2022 रोजी नंदुरबार शहरातील डी.आर. हायस्कूल जवळ सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाहनाच्या धडकेत एक पायी चालणारी महिला जखमी होवून महिलेच्या डोक्याला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. अशा वेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी महिलेला उचलून औषधोपचाराकामी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते, परंतु मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
  त्याच वेळी नंदुरबार शहरातील निर्भया पथक नेहमी प्रमाणे शाळा, महाविद्यालय, खाजगी क्लासेस, गर्दीच्या ठिकाणी शासकीय वाहनाने गस्त करीत असतांना त्यांना त्याठिकाणी गर्दी जमलेली दिसली. निर्भया पथकाने लागलीच त्याठिकाणी धाव घेवून बघीतले असता एक महिला खाली पडलेली असून तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता त्यामुळे निर्भया पथकातील पोलीस अंमलदारांनी त्या महिलेला उचलून निर्भया पथकाच्या वाहनातूनच औषधोपचाराकामी रुग्णालयात दाखल करुन अपघात ग्रस्त महिलेला मदत करुन माणूसकीचे दर्शन घडविल्याने निर्भया पथकाचे व नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतूक करण्यात येत आहे.
दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी  पोलीस अधीक्षक.  पी.आर.पाटील यांनी निर्भया पथकातील पोलीस अंमलदारांना त्यांचे दालनात उपस्थित राहणे बाबत कळविले होते. नेहमी प्रमाणे त्यांचे कर्तव्य करीत असलेले निर्भया पथकातील पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक यांनी पोलीस दालनात का बोलाविले असेल ? असा प्रश्न निर्भया पथकातील पोलीस अंमलदारांना पडला परंतु ,
   पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी निर्भया पथकातील पोलीस अंमलदार सहा. पोलीस उप निरीक्षक सलीम काझी, चतरसिंग पाडवी, महिला पोलीस शिपाई स्नेहा बोरकर, सुरेखा वळवी. यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करताच त्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले.
0 9 4 7 1 1
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *