समर्थ कृषी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे सुयश

Khozmaster
1 Min Read
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील खेळाडूंनी आंतर महाविद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊन सुयश प्राप्त केले. आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा अंतर्गत झालेल्या स्पर्धेत समर्थ कृषी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठ संघामध्ये झाली यापैकी कबड्डी क्रीडा स्पर्धा मध्ये आशिष घारमोडे व 800 मी धावणे स्पर्धेत शिवम नवले या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत क्रीडा महोत्सव या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सहभाग घेतला, तसेच तिरंदाजी या खेळा प्रकारात ऋषिकेश मताले, तर कुस्ती या खेळा प्रकारात निखिल राव व दीपक राठोड या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणारे श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे, सचिव नंदाताई कायंदे, संचालक तथा जि.प. सदस्य मनोज कायदे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच या यश प्राप्त खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय सर्व सुविधा उपलब्ध करून देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, जिमखाना प्रमुख प्रा. मोहजीतसिंग राजपूत, प्रा देवानंद नागरे, प्रा नारायण बोडके, प्रा शुभम काकड, प्रा सचिन गोरे व प्राध्यापक वृंद यांना दिले.
0 9 3 7 4 9
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *