प्रतिनिधी स्वप्नील गणगणे
मुर्तीजापुर तालुक्यातील हादगाव येथील तरुण युवक युवती घरून रागाच्या भारात पळून गेले होते त्यांना मुर्तीजापुर पोलीस विभागाने शोधून काढले व त्या दोघांना मूर्तिजापूर पोलीस स्टेशन मध्ये आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच त्याचे व त्याच्या परिवाराचे समजूत काढून कु साक्षी दीपक राऊत व गणेश उबरकर या दोघांचे परिवाराला आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा समजून सांगून त्यांच्या समझोता घडून आणला व तसेच त्यांच्या लग्नाचा खर्च आमदार हरीश पिंपळे यांनी करून दुर्गा माता मंदिर मूर्तिजापूर येथे लग्न लावून दिले यावेळी दोन्ही परिवारातील आप्तेष्ट मित्र परिवार या लग्ना सोहळ्याला उपस्थित होते,तसेच आमदार हरीश भाऊ पिंपळे मुर्तीजापुर सब इन्स्पेक्टर मनोहर वानखडे यांनी सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून मध्यस्थीत व कायदेशीर महत्त्वाची भूमिका बजावली आहे व यां दोघांच्या उपस्थित ला विवाह सर्वांच्या सहकार्याने मदतीने व उत्साहात पार पडला यावेळेस भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन देशमुख निलेश वानखडे राम जोशी आदीसह भाजपा पदाधिकारी सह आपका नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते संपूर्ण मुर्तीजापुर शहरांमध्ये आज या विवाहाची चर्चा होती.
Users Today : 7