सारंगखेडा यात्रेत 51 लाखाचा शेरा व 70 लाखाची शनाया ठरतोय  यात्रेचे आकर्षण.

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
सारंगखेड्याच्या घोडे बाजारात  1800 घोडे दाखल झाले असले तरी बाजारात चर्चा आहे ती शनाया आणि शेराची त्यांचा रुबाब आणि चाल पाहण्यासाठी अश्वशोकीन गर्दी करीत आहेत.राज्यात प्रसिध्द असलेल्या सारंगखेडा चा घोडे बाजारात चर्चा आहे . ती पंजाब येथून आलेल्या दाखल झालेला अवघ्या  32 महिन्याच्या शनियाची तिची डौलदार चाल , उंची त्यातील शुभ लक्षणे आणि त्याच सोबत तिच्या किमतीची . पांढराशुभ्र नुकरा जातीचा अश्व आहे . तिचे कान मारवाड आहेत त्यात तिची उंची 72 इंच इतकी आहे ती देशातील सर्वात उंच घोडी आहे
बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेते तिची किंमत अनमोल आहे.एका अश्व शोकिनाने तिची किंमत 70 लाख लावली मात्र मालकाने तिला दिली नाही . शनियाचा खुराक ची एखाद्या अभिनेत्रीच्या डाएट प्रमाणे काळजी घेतली जाते तिला दररोज पाच किलो सफरचंद , दूध त्याचप्रमाणे अन्य खुराक दिला जात असतो.
51 लाखाचा शेरा
घोड्याची किमत त्याची उंची रंग आणि चाल याच्यावर ठरत आसते घोडा जितका रुबाबदार तितकी त्याची किमत तितकी जास्त सारंगखेड्याचा घोडे बाजारात दाखल झालेल्या शेरा ची किमत एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल 51 लाख आहे आपल्याला प्रश्न पडला असेल याची किमत इतकी का सारंगखेडा घोडा बाजरात दाखल 1800 घोड्या मध्ये रुबाबदार आहे एखाद्या राजा प्रमाणे रुबाबदार आहे तिची उंची 63 इंच उंच चाल रुबाबदार आहे त्याची सेवा करण्यासाठी 24 तास 4 मजूर असतात त्याचा खानपान ची विशेष काळजी घेतली जाते त्याला दररोज पाच लिटर दुध एक किलो गावराणी तूप आणि चणाडाळ गहू आणि बाजरी त्याच सोबत कोरडा आणि सुका चारा दिला जात असतो.सारंखेडा घोडेबाजार दाखल झालेले महागड्या घोड्यांची विक्री हे मालक करत नसतात अश्वप्रदर्शनासाठी हे घोडे सारंखेडा येथे दाखल होतात या घोड्यांच्या ब्लडलाईन आणि इतर गोष्टींमुळे ते अश्व पैदाससाठी वापरले जातात त्यातून या घोड्या मालकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा होत असल्याचे अश्वतज्ञ जयपाल सिंह रावल सांगतात . 18 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या विश्व सौंदर्य स्पर्धांपासून सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये अधिक रंगत येणार आहे . कोट्यावधी किमतीचे घोडे खरेदी करण्याची आपली क्षमता नसली तरी कोट्यावधी आणि लाख किमतीचे घोडे पाहण्यासाठी चेतक फेस्टिवल भेट देणे जरुरीचे आहे .
0 9 4 7 0 4
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *