आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

KHOZ MASTER
1 Min Read
नंदुरबार
जिल्ह्यात खरीप हंगाम 2022-23 मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत निश्चित केलेल्या हमीभावाने मका, ज्वारी व बाजरी खरेदीस ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी बुधवार, 7 डिसेंबर, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.ज्या शेतकऱ्यांना मका, ज्वारी व बाजरी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणीसाठी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या हमीभाव योजनेचा लाभ घेवून मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन ही .सोनवणे यांनी केले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *