गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सीमेवरील  मद्यविक्रीस बंदी

KHOZ MASTER
1 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार 
गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सीमेवरील 5 किलोमीटर कार्यक्षेत्रात मद्य विक्री करण्यास मनाई असल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
गुरुवार 1 डिसेंबर 2022 रोजी मतदान तर गुरुवार 8 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी होणार असल्याने मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील हद्दीतील गुजरात सीमेपासून 5 कि.मी अंतरातील कार्यक्षेत्रात ही मनाई लागू असेल.गुजरात सीमेपासून 5 कि.मी अंतरातील हद्दीत मंगळवार 29 नोव्हेंबर, 2022 ते 1 डिसेंबर,2022 रोजी मतदान प्रक्रया पूर्ण होईपर्यत  तर गुरुवार 8 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी वरील दिवशी सर्व दुकाने बंद ठेवावीत. तसेच मद्यविक्री व अन्य व्यवहार करू नयेत. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल आणि संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *