*बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक दिव्यांगासाठी बनल्या आधारवड…*
*दिव्यांग बांधवांना मोफत प्रमाणपत्र, पेंशन, साहित्य , स्टॉल उपलब्ध करून देतात मदतीचा हात…*
नालासोपारा ता, १३ :- आपण समाजामध्ये अनेक दिव्यांग व्यक्ती पाहतो. अंध, मूकबधीर, हात किंवा पायाने अधू असलेला अनेक व्यक्ती समाजात आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांचं जगणं सर्वसामान्यांसारखं नसतं. अपंगत्वावर मात करुन त्यांना समाजात राहायचं असत.
नालासोपारा वसई विरार मधिल शेकडो दिव्यांग बांधवांना रूचिता नाईक यांच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांग पेन्शन, व्हिल चेअर, कुबड्या, सायकल, राशन किट मोफत देण्यात येत असतात.
नालासोपारातील सुवर्णा खेडेकर यांना पायाचा त्रास असल्याने व नालासोपारा येथील दिव्यांग चंद्रकांत धोत्रे यांना डोळ्यांनी कमी दिसत असल्याने या दोघांना उपजिवीकेसाठी दिव्यांग पेन्शन, स्टॉल करिता दिव्यांग प्रमाणपत्राची नितांत गरज होती अनेक वर्ष प्रयत्न करून हि दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत होती. याबाबत बहुजन विकास आघाडीचा रूचिताताई नाईक यांना सांगताच सुवर्णा खेडेकर व चंद्रकांत धोत्रे यांना मोफत दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिव्यांगांचा वाट्याला शासकीय योजनेचा लाभ पोहोचायला कितीतरी वर्षे लागतात. अनेकांना लाभ मिळाल्याची माहितीही नसते. अशा गरजूंपर्यंत पोहचुन रूचिता नाईक त्यांना मदत मिळवुन देत आहेत.
अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातुन कौतुक होत आहे. ही मदत नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना दिव्यांग बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहुन
दिव्यांगानाही सक्षम करून त्या मुख्यजजग प्रवाहात आणण्यासाठी मदत करणार असल्याचे रूचिताताई नाईक यांनी आपली भावना व्यक्त केली.
शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असते. प्रमाणपत्र नसल्याने दिव्यांग असूनही अनेकांना या लाभांपासून वंचित राहावे लागत होते. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी संघर्ष अनेकांचा वाट्याला आला आहे. अखेरीस त्याची दखल घेत
बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांनी पुढाकार घेत दिव्यांग बांधवांचा मदतीसाठी पुढे येऊन त्यांचा माध्यमातून मदत मिळवुन देत आहेत.
