महाराणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ व महाराणा प्रताप यांना अभिवादन

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली : प्रतिनिधी

चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय इतिहासातील तीन महान प्रेरणास्थाने असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व विचार जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तिन्ही महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

भारताच्या इतिहासात अनेक महान व्यक्तींनी आपल्या शौर्य, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि दूरदृष्टीच्या जोरावर समाजाला नवी दिशा दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ आणि महाराणा प्रताप हे अजरामर व्यक्तिमत्त्व असून त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात इतिहासातील या महान व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या विचारांमधून समाजाने प्रेरणा घेऊन कर्तव्य, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी डॉ. मोहम्मद इसरार, काशिनाथअप्पा बोन्द्रे, नगरसेवक गोपाल देव्हडे, गोकुळ शिंगणे, रत्नदीप शिनगारे, अंबादास वाघमारे, दिलीप चवरे, लिंबाबापू देशमुख, भिका शेटे, प्रशांत भटकर, सिदेश्वर परिहार, राहुल चवरे, बबू काझी, मनोज शर्मा, बशीद जमदार, शेख अजीम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *