पायी चालता वारी
सेवा घडते कायिक
गाते अभंग जिव्हा
सेवा घडते वाचिक
विठ्ठलविठ्ठल अंतरी
सेवा घडे मानसिक
जीव शिव एक रुप
समाधान आत्मिक
घडे उपवास खास
सेवा घडते सात्विक
विसरे सारे भेदभाव
सेवा घडे भावनिक
पदर मोड करताना
सेवा घडते आर्थिक
रे सेवा वारक -यांची
पुण्य जोडे भाविक
दुकानसजे मदतीले
रे सेवाव्यावसायिक
नियमांने बांधीलकी
भान ठेवे सामाजिक
हरिवीण काही नाही
पंढरी मना स्थायिक
पांडुरंग नसा नसात
विठूरायाचे पायिक
हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
