उदयनगर प्रतिनिधी
उदयनगर येथे बरेच दिवसापासून वरली मटका चक्री अस्या अवैध धंद्याला उत आला असून या सट्टे बाजारामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहे येथे सट्टा खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशी वर्गाला खूप त्रास होत आहे येथे राहणाऱ्या महिलांना सुद्धा याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे तसेच येथे दारू पिऊन येणाऱ्या लोकांमुळे शाळकरी मुलांना आणि गावातील नागरिकांना उगाच त्रास का सहन करावा असा सवाल मुज्जमिलखान अनवर खान यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिनांक 26 12 2022 रोजी दिलेल्या निवेदनात केला आहे अवैध धंदे हे तत्काळ बंद करून उदयनगर येथील नागरिकांना दिलासा द्यावा असे या निवेदानात म्हटले आहे.
Users Today : 17