बुलडाणा, दि. 11 : जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब जयंतीनिमित्त गुरूवार, दि. 12 जानेवारी 2023 रोजी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.जिल्हाधिकारी यांना असलेल्या अधिकारानुसार जिल्ह्यासाठी सन 2023 या वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. यात राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब जयंती, तसेच बुधवार, दि. 30 ऑगस्ट 2023 रोजी नारळी पौर्णिमा, शुक्रवार, दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठ गौरी पूजन निमित्त सुट्टी राहिल. सदर सुट्टीचा आदेश जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Users Today : 35