नामांतर ..
आठवण करेजागी
रे नामांतराचा लढा
ढवळूनि जाय देश
गाजला मराठवाडा
सोपे काहीचं नसते
उलटा सुलटा तिढा
पोखरायला तय्यार
मनु वादाचा किडा
वाटेत उभा नेमका
डोंगर आडवा चढा
भिमसैनिक निर्धार
भला शिकवू धडा
हवेचं का नामांतर
कुणी गिरवी पाढा
संघर्षकर्त्याचा मात्र
भिम विश्वास गाढा
खेकडी राजकारण
पाय मागेमागे ओढा
अमूक तमूक देणार
पण हा नाद सोडा
गाढवांनी अडवला
जागोजागी रे घोडा
बुलढाण्या जवळचा
कसा घातला राडा
भिम सैनिके घेतला
संघर्ष कराया विडा
सफल होई नामांतर
पडे आनंदाचा सडा
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com
Users Today : 33