संगणक परिचालकाचं बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा.पालघर :सौरभ कामडी

Khozmaster
1 Min Read
मोखाडा:- ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकांचा काम बंद बेमुदत आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक 27 नोव्हेंबर 2023 पासून सुरु झाले आहे यात जव्हार तालुक्यातील व पालघर जिल्हा्यातील ही विविध ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक यांनी आपला पाठिंबा हा दर्शवला आहे, या आंदोलनाच्या प्रमुख तीन मागण्या आहेत एक म्हणजे संगणक परिचालक यांना शासन कर्मचारी दर्जा मिळावा व दुसरी संगणक परिचालक यांना विस हजार रुपये मासिक पगार मिळावा व तिसरी मागणी नव्याने सुरु केलेली टार्गेट सिस्टीम रद्द करावी ह्या मागण्या आहेत,
           यावेळी जव्हार तालुक्यात ही या मागण्याचं निवेदन देण्यात आले आहे यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी मा.राजेश भोये,संदीप,अंकुश वड कानोजा,विलास कोरडा,बारकू दिघा,निकिता धनगर,वृषाली पवार,सुशीला मुकणे इत्यादी उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *