नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधिमंडळाबाहेर भाजपच्या आमदारांनी काँग्रेसविरोधात निदर्शनं केली.
काय म्हणाले प्रियांश खरगे?
प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत म्हटलं की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता. या वक्तव्यावरून राज्यभर रण पेटले आहे. त्याचे पडसाद आज विधानभवनातही दिसून आलेत. परिसरात भाजपच्या आमदारांनी स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ निदर्शने केलीत.आंदोलनात आशिष शेलार, बंटी भांगडिया, सुनील राणे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे, राम कदम, समीर मेघे सहभागी होते.
Users Today : 21