टेकाडी (को.ख.) येथे नि:शुल्क शासकीय वैयक्तिक योजनांचे शिबिर संपन्न*
दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी, टेकाडी को. ख. ता.पारशिवनी येथे “आमदार कार्यालय आपल्या दारी अभियान” अंतर्गत अॅड.आशिष जयस्वाल यांच्या कार्यालया तर्फे निःशुल्क शासकीय वैयक्तिक योजनाचे शिबिर टेकाडी (को.ख.) येथील कामठी कोलारी वॉर्ड क्र.३ येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण- ३२६ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये रेशन विभागाचे अर्ज -३९, निराधार योजनेचे अर्ज – ०६, जणधन बचत खाते -२८, आभा कार्ड -६४ तसेच १५९ लाभार्थीचे निःशुल्क आयुष्यमान भारत विमा कार्ड बनविण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच श्री.जितेंद्र चव्हाण, सदस्य श्री.त्रिभुवन सिंग, सदस्य श्री.कृणाल वासाडे, श्री.भारत गजबे, श्री.सचिन कांबळे, श्री.भूपेंद्र सिंह व समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.
Ramesh Chavhan
KhozMaster
Mehkar
Mob.No. 9657451596
Users Today : 40