प्रतिनिधी : फैजल पठाण .शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी रोजी भारतातून तसेच इतर राज्यांमधून लाखो-भीमअनुयायी शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे नगर पुणे रोडवर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. वाहतूक व्यवस्थित पार पडावी वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये. यासाठी न्हावरा फाटा या ठिकाणी बॅरिगेट्स व पोलीस चौकी तयार करून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करून तसेच लाऊड स्पीकर द्वारे सूचना देऊन शिरूर पोलीस स्टेशनचे पीआय संजयजी जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर सायंकाळी ५.०० वाजल्यापासून भीमा कोरेगाव, विजयस्तंभा कडील वाहने वगळता इतर वाहणांसाठी पर्यायी मार्ग न्हावरा-केडगाव-चौफुला – पुणे मार्गे वळवण्यात आली. यासाठी पी आय सुनील उगले, पीआय सुजाता पाटील, पोलीस कर्मचारी शेखर झाडबुके रघुनाथ हळणवर, पवन तायडे, नितेश थोरात, भोई, कोठे तसेच होमगार्ड, पोलीस मित्र हिना शेख तालुकाध्यक्ष, संदीप कर्डिले, अमोल फोलवणे, सुनील ढवन, सोहेल शेख, सुदाम रणदिवे इत्यादी कर्मचाऱ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली व वाहतूक व्यवस्था अतिशय नियोजन पद्धतीने हाताळली गेली.
Users Today : 32