माझ्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केली होती मुख्यमंत्र्याकडे मागणी
माझ्या नेतृत्वात बारी समाजाच्यावतीने राज्यभरातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ द्यावे अशी मागणी केली होती….!
मागणीच्या दुसऱ्या दिवशीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळाच्या अधिवेशनात सदर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. त्यामुळे बारी समाजात उत्साहाचे वातावरण आहे…!
बारी समाजाचे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे याकरिता बारी समाजाच्यावतीने मागील अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली जात होती…!
माझ्याकडे बारी समाजाचे राज्यभरातील शिष्टमंडळ यांनी भेट देऊन ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे रेटावी अशी मागणी केली होती. ..!
मी समाजाच्या विविध मागण्यासह बारी समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे अशी मागणी एका दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्याकडे केली होती. सदर विषयाचे महत्त्व व गांभीर्य पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दुस-याच दिवशी बारी समाजासाठी राष्ट्रसंत शिरोमणी श्री. रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले….!
राज्यात एवढ्या तडकाफडकी मागणी पुर्ण होण्याची ही पहिलीच घटना असून या संदर्भात बारी समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सदर मागणी पूर्ण करण्यात माझा सिंहाचा वाटा असल्याने राज्यभरातील बारी समाजाच्यावतीने माझे आभार व्यक्त केले जात आहे….!