…तर खाली उडी मारेन! मंत्रालयात खळबळ, चौथ्या मजल्याच्या खिडकीवर चढून इसमाची धमकी

Khozmaster
1 Min Read

मुंबई- मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती मंत्रालयाच्या चौथ्या माळ्याच्या मागील बाजूतील खिडकीवर चढला आहे. या खिडकीतून त्या व्यक्तीने उडी मारण्याची धमकी दिली आहे.

अधिकारी त्या व्यक्तीसोबत चर्चा करत आहेत. फायर ब्रिगेड आणि पोलिस या इमारती ठिकाणी आले आहेत.

या व्यक्तीचे काहीतरी प्रशासकीय काम असून तो झालेले नाही म्हणून या व्यक्तीने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर चढून खाली उडी मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान त्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *