भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक, आगीत चालक जागेवर जळून खाक

Khozmaster
1 Min Read

 

कोरेगाव : सातारा-लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्ग आज, सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे दोन भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही ट्रकला आग लागली. त्यामध्ये एका ट्रकमधील चालकाला बाहेर पडता न आल्याने तो ट्रकमध्येच जागेवरच जळून खाक झाला. दुसऱ्या गंभीर जखमी चालकाला उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तर, आणखी दोघे गंभीर जखमी आहेत.

अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. मात्र तब्बल दोन तासानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. जखमी अन्य दोघांवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व जखमीची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *