आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना जनसंवाद दौऱ्यादरम्यान कोल्हापूर येथे आयोजित ”लाडकी बहिण भेट ” कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. राज्यातील सर्व महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देत संवाद साधला. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिमा दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येत असून आतापर्यंत कोट्यवधी महिलांना दोन महिन्यांचे पैसै मिळाले आहेत. तर उर्वरित महिलांनाही तीनही महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहे. यामुळे राज्यातील माय – भगिनिंच्या संसाराला आर्थिक हातभार लागणार आहे, असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच आपल्या सरकारच्या माध्यमातून महिलांना एसटी प्रवासात सुट, मुलींना मोफत उच्चशिक्षण, लेक लाडकी योजना, बचत गटांना अर्थ सहाय्य यांसह अनेक कल्याणकारी योजना महिलांसाठी राबविण्यात येत आहे. येणाऱ्या काळातही सर्व महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतील, यासाठी तुम्हा सर्वांचा आम्हाला आशीर्वाद हवा आहे. असे मत यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी राज्यात लाडकी बहिण योजना राबविल्याबद्दल उपस्थित महिलांनी सरकारचे आभार मानले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 27