काय चललंय! Reliance Jio ने आधी दर वाढवले, आता 10 रुपयात 2GB डेटा, फ्री कॉलिंग

Khozmaster
1 Min Read

जिओ आणि एअरटेल, Vodafone idea सारख्या इतर कंपन्यांनी 3 जुलैपासून आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली आहे. या कंपन्यांनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅनच्या किंमतीत 15 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. दरवाढीमुळे बीएसएनएलचे प्लॅन सर्वात स्वस्त असल्याने अनेक जण बीएसएनएलकडे जात आहेत. विशेष म्हणजे बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत देखील यामुळे वाढ झाली आहे. मात्र, यात आता जिओने ग्राहक वळवण्यासाठी प्लॅन स्वस्त केला आहे. याविषयी जाणून घ्या.

आता ग्राहक बीएसएनएलकडे वळत असताना जिओने आपल्या ग्राहकांसाठी काही नवे स्वस्त प्लॅन आणले आहेत. जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन जारी केला आहे. या प्लॅनमध्ये आपल्याला रोज 2GB डेटा आणि नो लिमिट कॉलिंग मिळेल. हा प्लॅन 98 दिवसांचा असून रोज सुमारे 10 रुपये खर्च येणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.जिओचा हा नवा प्लॅन 999 रुपयांचा असून 98 दिवस चालणार आहे. यामध्ये तुम्हाला रोज 100 SMS फ्री मिळतील आणि तुम्ही मर्यादेशिवाय कॉल करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 2GB डेटा मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला 5G इंटरनेट फ्री मिळणार आहे. तसेच जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमा मोफत मिळणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *