श्रीहरी नगर मानेवाडा येथे भव्य भागवत साप्ताहचा समारोप
श्रीहरी नगर नं.२, मानेवाडा येथे २१ ते २८ एप्रिल या कालावधीत भव्य संगीतमय भागवत साप्ताहचे आयोजित करण्यात आले. ह.भ.प. कुमारी परमेश्वरी दीदी सेलोटकर यांनी त्यांच्या मधुर वाणीतून भगवत कथा वाचन केली. उन्हाळयाचे दिवस असून सुद्धा भागवत कथा ऐकण्याकरित स्त्री व पुरुषांनी एकच गर्दी केली होती. गोपाल काल्याचे कीर्तन ह.भ.प.श्री. रायजी प्रभू शेलोटकर महाराज यांनी केले त्यांना खालील संगीत कलाकारांनी सुरेख संगीताची साथ दिली.
१) ह.भ.प.श्री.निलेश मोहरकर महाराज ऑरगन वादक व गायक- रा. अमरावती
२) संजय मुधोळकर झाकी दर्शन रा. मोझरी, जिल्हा अमरावती
३) केशव उर्फ बाबा निर्मळ गायक व हार्मोनियम वादक-रा.वर्धा
४) मंगेश वानखडे तबला वादक रा. मंगरूळ दस्तगीर
५) रोहित कडू -पॅड वादक
६) जगदीश मेटकर -सह गायक व झाकी दर्शन भागवत कथे सोबत, सामुदायिक ध्यान, प्राणायम, योगा, कराटे, तलवारबाजी व हरिपाठ घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीहरी नगर व परिसरातील लोकांनी मोलाचे सहकार्य केले. नुकत्याच २८ एप्रिल रोजी ग्रंथ दिंडी व सायंकाळी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यात सुरेश उरकुडे, विठ्ठलराव घोडे, रामदास कोल्हे, छोटू जगनाडे, रवींद्र नखाते, केशवराव बोपुलकर, गणेश भारद्वाज, डॉ.अशोक मंदे, अशोक माहुरे, घनश्याम ढोले, प्रवीण सूरकर, शिवराम गुरुनुले, राजेश होरे, सौ.कुसुम कोल्हे, श्रीमती सिंधू कुन्हाडकर, सौ.मंगला उरकुडे, सुरजभान सिंह, जानराव बारई राजेंद्र सुळके यांनी मोलाचे सहकार्य केले.
Users Today : 33