माळेगाव, ता. मेहकर ;-
मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळेगाव येथे दिनांक २३ डिसेंबर रोजी एका विहिरीत गर्भवती विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या सासरच्या कुटुंबातील तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे वडील गजानन सिताराम करवते (रा. वाकळवाडी, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी साधना हिचा विवाह माळेगाव येथील विष्णू रामभाऊ चौंडकर याच्याशी झाला होता. साधना गर्भवती असताना पती विष्णू चौंडकर व इतर दोन व्यक्तींनी माहेरून दीड लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत तिला सातत्याने मानसिक त्रास दिला.
या छळाला कंटाळून साधनाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ४३३ नुसार बीएनएस कलम ८०, १०८ (३)(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, नायब तहसीलदार नितीन बोरकर, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे तसेच जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
सदर प्रकरणात आत्महत्या की घातपात, याबाबतचा सखोल तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
गर्भवती विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
9
4
5
4
4
Users Today : 9
Leave a comment