जालना : सीसीआयकडून कापसाची चांगली किंमत, तरीही शेतकरी खाजगी बाजारात विकण्यास बाध्य

Khozmaster
2 Min Read

जालना प्रतिनिधी ;–

शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला खाजगी बाजारापेक्षा सीसीआयकडून जास्त भाव मिळत असल्याचे पाहता शेतकरी सीसीआयला कापूस देण्याकडे कल करत आहेत. मात्र, अटी-शर्तीमुळे अनेक शेतकरी तोटा सहन करून खाजगी बाजारात कापूस विकण्यास भाग पाडले जात आहेत.
जिल्ह्यातील आठ सीसीआय खरेदी केंद्रांवर आतापर्यंत ५ लाख ७५ हजार १०७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. दुसरीकडे, किसान अॅपवर ३८ हजार ८९७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी आतापर्यंत १६ हजार ६९६ शेतकऱ्यांनाच अप्रूवल देण्यात आले असून, ५,६३७ शेतकऱ्यांची नोंदणी फेटाळण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि जादा भाव असूनही खाजगी बाजारात कमी भावात कापूस विकावा लागतो.
जालन्यातील नवीन मोंढ्यात सीसीआयने ८,०१० ते ७,८५० रूपये प्रती क्विंटल दराने २,६०९ क्विंटल कापूस खरेदी केली, तर खाजगी बाजारात फक्त ११७ क्विंटल खरेदी झाली असून सरासरी भाव ६,८२३ रुपये प्रती क्विंटल राहिला.
जिल्ह्यातील केंद्रानिहाय खरेदीचा आकडा पुढीलप्रमाणे:
जालना: ८४५ शेतकरी – १९,९८८.८ क्विंटल
बदनापूर: १,१७२ शेतकरी – ३५,४३१.५ क्विंटल
अंबड: ६५५ शेतकरी – १४,४८१ क्विंटल
घनसावंगी: १,७८० शेतकरी – ३३,३०० क्विंटल
भोकरदन: ४,५२७ शेतकरी – १,१४,८१९.८ क्विंटल
जाफ्राबाद: ५६७ शेतकरी – १४,६९८.६ क्विंटल
परतूर: १,५८६ शेतकरी – २९,२१० क्विंटल
मंठा: ५७९ शेतकरी – १३,४७८ क्विंटल
एकुण ११,७११ शेतकऱ्यांनी ५,७५,१०७.६ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जो माल हाती आला त्याच्यावर शेतकरी विक्री करत आहेत. सीसीआयच्या आठ खरेदी केंद्रांवर जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर व मंठा येथे कापसाची खरेदी सुरू आहे.
शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की, जादा भाव असूनही अटी-शर्तीमुळे त्यांना खाजगी बाजारात कमी भावात विकावे लागत असल्याने सीसीआयच्या खरेदी प्रक्रियेत सुधारणा करणे आवश्यक आहे.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *