अमरावती : एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही लवकरच शहरात लागू होणार – पालकमंत्री बावनकुळे

Khozmaster
1 Min Read

अमरावती प्रतिनिधी :
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उणीवेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मागविणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महापालिका क्षेत्रातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावे असा प्रस्ताव महापालिकेकडून आणि पोलीस आयुक्तालयाकडून वेळोवेळी तयार केला जात आहे. तथापि, गेल्या सात ते आठ वर्षांपासून अद्याप एकही सीसीटीव्ही शहरात लावले गेलेले नाही.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, “एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही अत्याधुनिक असून, त्यांची चित्रण व दृश्यमान क्षमता अधिक आहे. या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना अनोळखी इसम किंवा गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्यांच्या संभाव्य उद्देशांचा अंदाज घेणे शक्य होणार आहे.”
गेल्या काही वर्षांत पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांनी सीसीटीव्ही लावण्याचे आश्वासन दिले, मात्र ठोस कार्यवाही झाली नाही. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही जाहिरनाम्यातून अशाच आश्वासनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, “आता आपण स्वतः या प्रकल्पावर लक्ष ठेवणार आहोत आणि लवकरच शहरात एआय आधारित सीसीटीव्ही लावण्याचा मुहूर्त ठरवला जाईल.”

0 9 4 5 5 9
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *