वाशिम : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यभूत साहित्य वितरण

KHOZ MASTER
1 Min Read

वाशिम प्रतिनिधी :

मंगरुळपीर तालुक्यातील नोंदणीकृत दिव्यांग बांधव व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत सहाय्यभूत साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम खासदार Sanjay Deshmukh यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडणार आहे.
गेल्या वर्षी शेलूबाजार येथे आयोजित नोंदणी शिबिरात मोठ्या संख्येने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. नोंदणी पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांना व्हीलचेअर, ट्रायसायकल, वॉकर, काठी, श्रवणयंत्र आदी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची माहिती:
स्थळ: अहिल्यादेवी सामाजिक सभागृह, मालेगाव रोड, शेलूबाजार
दिनांक: बुधवार, ०४ मार्च २०२६
वेळ: दुपारी १.०० ते ४.००
खासदार संजय देशमुख यांनी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी व नोंदणी प्रमुखांकडून करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता येणार असून शासनाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचीती पुन्हा एकदा येणार आहे.

0 9 3 7 0 6
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *