तानाजी मापारी लोणार प्रतिनिधी :
लोणार येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात नववे राष्ट्रीय स्तरावरील लोणार विज्ञान महोत्सव 6 मार्च ला थाटात संपन्न झाले. हे वर्ष महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यामुळे या विज्ञान महोत्सव ला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार आणि कै. कमलाबाई क. बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या लोणार विज्ञान महोत्सवासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, आर. ए. महाविद्यालय वाशिम, विवेकानंद महाविद्यालय हिवरा आश्रम तसेच डॉ. पंडित विद्यासागर फाउंडेशन, पुणे यांच्या सहयोगाने आयोजन करण्यात आले होते. लोणार विज्ञान महोत्सवाची सुरुवात सकाळी ढोल ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या उत्साहात विज्ञान ज्योत रॅली व ग्रंथ दिंडी ने करण्यात आली, याप्रसंगी उद्घाटक म्हणून सन्माननीय प्रकाशभाऊ मापारी, सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था लोणार, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. केशरीलाल वर्मा कुलगुरू छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल नवी मुंबई, डॉ. प्रदीप खेडकर , राष्ट्रीय सचिव प्रांतअध्यक्ष अखिल भारतीय शैक्षिक महासंघ, प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू, सचिव डॉ. संतोष बनमेरू, श्री राजूभाऊ मापारी माजी जिल्हा परिषद सदस्य, पोलीस स्टेशन, लोणार चे ठाणेदार श्री सदगीर साहेब, प्राचार्य डॉ. ओमराज गजभिये यांची उपस्थिती होती, ग्रंथ दिंडी व विज्ञान रॅलीचे विसर्जन महाविद्यालयाच्या गेटवर लेझीमचे सुंदर असे सादरीकरण करण्यात आले, त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते विज्ञान ज्योत ही लोणार विज्ञान महोत्सव समन्वयक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर लोणार विज्ञान महोत्सव उद्घाटन समारंभ घेण्यात आला, कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून अमृत सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ उषाताई गोले तर उद्घाटक म्हणून डॉ.केसरीलाल वर्मा (कुलगुरू, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल नवी मुंबई), प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. प्रदीप खेडकर (राष्ट्रीय सचिव व प्रांताध्यक्ष अखिल भारतीय शैक्षणिक महासंघ), प्राचार्य डॉ. विजय नागरे (व्यवस्थापन परिषद सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू , प्रा. बळीराम मापारी (जिल्हाध्यक्ष शिवसेना बुलढाणा जिल्हा), डॉ. संतोष बनमेरू (सचिव, अमृत सेवाभावी संस्था परभणी), श्री रमेश बनमेरू (कोषाध्यक्ष, अमृत सेवाभावी संस्था परभणी), प्राचार्य डॉ.मीना निकम, प्राचार्य डॉ.ओमराज गजभिये, माझी प्राचार्य भिकमचंद रेदासनी (महाविद्यालयीन विकास समिती सदस्य), भाजपा शहराध्यक्ष श्री.शुभम बनमेरू , उद्योजक श्री. प्रशांत बनमेरू, दैनिक सह्याद्रीचा राखणदार चे संपादक श्री आशिष घुमे, दैनिक देशोन्नती विशेष प्रतिनिधी श्री उमेश कुटे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली, राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवाचे प्रास्ताविक या महोत्सवाचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉ.प्रकाश बनमेरू यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून लोणार विज्ञान महोत्सव च्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत लोणार सरोवर संवर्धन व जतन करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा लोणार विज्ञान महोत्सव कसा फायद्याचा ठरत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली, या नंतर उद्घाटन पर मनोगतातून कुलगुरू डॉ.केसरीलाल वर्मा यांनी लोणार विज्ञान महोत्सवाला शुभेच्छा देत हा उपक्रम लोणार सरोवर जतन व संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये लोणार सरोवराच्या वैज्ञानिक संकल्पना बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होते आणि भविष्यात हेच विद्यार्थी या लोणार सरोवरच्या जतनासाठी कटिबद्ध राहतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री आयुष मंत्रालय भारत सरकार सन्माननीय श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन पर मनोगत व्यक्त करत हा अभिनव उपक्रम आहे नक्कीच यामुळे लोणार सरोवर जतन व संवर्धनासाठी मदत होणार असून यासाठी महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्या, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व डॉ. पंडित विद्यासागर फाउंडेशन पुणे चे सर्वेसर्वा डॉ. पंडित विद्यासागर यांनी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांना लोणार सरोवराची जैवविविधता व भविष्यात याची उपयोगिता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालयाचा हा रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे वर्तमानपत्र दैनिक सह्याद्रीच्या राखणदार यांच्याद्वारे महाविद्यालयाच्या सन्मानार्थ पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ,यासाठी सह्याद्रीचा राखणदारचे संपादक सन्माननीय यशवंत घुमे, आशिष घुमे यांचे मोलाचे सहकार्य राहिले आहे . त्यानंतर विवेकानंद महाविद्यालय हिवरा आश्रमच्या प्राचार्य डॉ.मीना निकम मॅडम यांनी विज्ञानातील संकल्पना आणि सरोवराची जैवविविधता यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व स्व.नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की लोणार विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांचा उपयोग करून त्याद्वारे लोणार सरोवराचा विकास व त्याचे पर्यटनाला चालना कशी मिळेल याबाबत गांभीर्याने विचार करून या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन करावे. यानंतर शिवसेना जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रा. बळीराम मापारी यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर कमी करावा , वाचनाची सवय लावावी व आलेल्या उच्च विद्याविभूषित पाहुण्यांचे विचार ऐकून त्यावर अमलबजावणी करावी व त्यांच्या अफाट ज्ञानाचा फायदा घेऊन आपले भविष्य उज्वल करावे व लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी कटिबद्ध व्हावे असे प्रतिपादन केले. यानंतर राष्ट्रीय सचिव तथा प्रांताध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे प्रा. डॉ. प्रदीप खेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत लोणार विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून लोणार सरोवराची जैवविविधता ही अफाट आहे लोणार सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःची भविष्य उज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून लोणार सरोवर हे खूप मोठे साधन आहे या साधनाचा उपयोग करून विद्यार्थी स्वतःची भविष्य उज्वल तर करूच शकतात पण त्याचबरोबर लोणार सरोवराचे जतन व संवर्धन देखील होईल असे प्रतिपादन केले. यानंतर अध्यक्षीय समारोपातून कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. उषाताई गोले यांनी विद्यार्थ्यांना आईन्स्टाईन चा किस्सा सांगत विज्ञाननाचे क्षेत्र हे अफाट आहे त्यातील मूलभूत संकल्पनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा व त्याचा फायदा लोणार सरोवर जतन व संवर्धन करण्यासाठी उपयोगात आणावा असे प्रतिपादन केले. या उद्घाटन सोहळ्याचे बहरदार व मंत्रमुग्ध करणारे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शारीक शेख यांनी तर आभार प्रदर्शन लोणार विज्ञान महोत्सवाचे समन्वय प्रा. डॉ. सुर्यकांत बोरूळ यांनी केले. या विज्ञान महोत्सवात वैज्ञानिक मॉडेल प्रदर्शन, पोस्टर सादरीकरण, विज्ञान प्रतिभा प्रश्नमंजुषा, स्पॉट पेंटिंग स्पर्धा तसेच पुष्परचना स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी लोणार सरोवर जैवविविधता या विषयाला अनुसरून विविध वैज्ञानिक संकल्पनांचा वापर करून उत्कृष्ट असे वैज्ञानिक मॉडेल, पोस्टर, पुष्पगुच्छ रचना, स्पॉट पेंटिंग, रांगोळी इत्यादी कला प्रकारांमध्ये आपली कलेचे सादरीकरण केले.यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख विषय “लोणार सरोवर संवर्धन” आणि “विज्ञान व तंत्रज्ञान” होते सामाजिकदृष्ट्या उपयुक्त व नाविन्यपूर्ण प्रकल्पांना विशेष प्राधान्य दिले गेले. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लोणार विवराच्या संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले.
यानंतर लोणार विज्ञान महोत्सवाचा बक्षीस वितरण व निरोप समारंभ संपन्न झाला या बक्षीस वितरण व निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू तर प्रमुख अतिथी म्हणून शिवछत्र मित्र मंडळ, लोणार चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री नंदूभाऊ मापारी, लोणार नगरीच्या प्रथम नागरिक (नगराध्यक्षा न. प. लोणार) सौ. मीराताई भूषण मापारी, कै. कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज गजभिये. लोणार विज्ञान महोत्सवाचे समन्वयक डॉ सुर्यकांत बोरुळ, यांची उपस्थिती होती. यावेळी विविध महाविद्यालय, विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच सोबत आलेल्या प्राध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त करत लोणार विज्ञान महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल महाविद्यालयाला धन्यवाद दिले व या महोत्सवच्या माध्यमातून आम्हाला खूप काही शिकवयास मिळाले व लोणार सरोवराचे महत्त्व देखील कळले आहे असे सांगितले. याप्रसंगी सौ. मीराताई मापारी यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना लोणार सरोवराबाबत जागृत राहून लोणार सरोवराचे विकास करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले व महाविद्यालय करत असलेल्या कार्याचा गौरव केला, श्री नंदूभाऊ मापारी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आजचा युवा हा लोणार सरोवर जतन व संवर्धन करण्यासाठी सक्षम आहे असे सांगितले यानंतर प्राचार्य डॉ. ओमराज गजभिये यांनी ऐतिहासिक वस्तूंचा मिळालेला ठेवा अमूल्य असून त्याबाबत देखील विद्यार्थ्यांनी जागृत राहून लोणार सरोवराचे सौंदर्य अबाधित ठेवावे अशी विनंती केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संतोष बनमेरू यांनी लोणार विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून लोणार सरोवराची जैवविविधता जोपासण्याचे कार्य करण्यासाठी महाविद्यालय सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली. या लोणार विज्ञान महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले, यात सायन्स टॅलेंट क्विझ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.अश्मिरा अनम शेख अख्तर, डॉ. आर. एन. लाहोटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, सुलतानपूर द्वितीय क्रमांक कु.कनिष्ठ दीपक मापारी कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार , तृतीय क्रमांक कु. साक्षी उल्हास गायकवाड, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, हिवरा आश्रम , तर वैज्ञानिक पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. श्वेता अंभोरे, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, हिवरा आश्रम तर द्वितीय क्रमांक प्रमोद गिराम ,शाहू फार्मसी कॉलेज , बुलढाणा , तृतीय क्रमांक मोहम्मद इलियास कै.कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार, वैज्ञानिक मॉडेल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कृष्णा जाधव, आर. ए. कॉलेज वाशिम ,द्वितीय क्रमांक भारत ठाकरे आर. ए.कॉलेज , वाशिम, तृतीय क्रमांक कु.आरती अंभुरे कै. कु. दुर्गा क.बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार, ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कामन्ना मोहित स्कूल ऑफ फार्मसी एस. आर. टी. एम. विद्यापीठ नांदेड, द्वितीय क्रमांक कु. प्रियंका गोळे आर. ए. कॉलेज , वाशिम, तृतीय क्रमांक कु.मानसी आराखराव आर. ए. कॉलेज , वाशिम तर प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून कु. नेतल मंधोरा आर. एन. लाहोटी महाविद्यालय, सुलतानपूर , पुष्पगुच्छ रचना स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सलोनी मारोठे , कै.कु. दुर्गा बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार द्वितीय क्रमांक कु. जान्हवी मन्नोत , पुष्पादेवी पाटील महाविद्यालय, रिसोड, तृतीय क्रमांक कु. अमृता भवन, भगवान बाबा महाविद्यालय लोणार इत्यादी विद्यार्थ्यांनी पटकाविले. यामध्ये बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ, मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या लोणार विज्ञान महोत्सवामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत बरेच महाविद्यालयांनी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील जवळपास सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ. महेंद्र भिसे व आभार प्रदर्शन डॉ. सौरभ गायकवाड यांनी केले. सदर लोणार विज्ञान महोत्सव यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पथक परिश्रम घेतले.
Users Today : 18