पिंपरी-चिंचवड –
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रतिमा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील खासगी आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या पाच हजारांहून अधिक पदांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात येणार असून नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.
हा रोजगार मेळावा गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, समर्थ नगर, नवी सांगवी, पिंपरी-चिंचवड येथे पार पडणार आहे.
मेळाव्यात पाचवी पास ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवक-युवतींनाही सहभागी होता येणार आहे.
आयोजकांनी जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी आयोजकांकडून संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Users Today : 8