पोलीस महापालिकेत येताच अधिकारी गायब

KHOZ MASTER
3 Min Read

नाशिक :

बहुचर्चित म्हाडा प्रकरणात नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश आबाजी पाटील यास नाशिक शहर पोलिसांनी अटक केल्याने नगरचना विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत असून, तपासासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात येत आहेत. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अधिकारी वर्ग महापालिकेत न थांबण्यात धन्यता मानता आहे. परिणामी, ‘पोलीस महापालिकेत आणि अधिकारी गायब’ असे चित्र सध्या महापालिकेत दिसत आहे.
म्हाडा प्रकरणाच्या तपासासाठी प्रशासकीय विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम आहेत. या एसआयटीमध्ये ५ सदस्य आहेत. म्हाडाच्या ४९ भूखंड वाटाअत बेकायदा व्यवहार करण्यात आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस १९८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोन मनवाणी, दीपक करमचंदानी, नायब तहसीलदार नितीन पाटील, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश आबाजी पाटील, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक बिपीन काजळे यांना अटक केली. म्हाडा प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी नगररचना विभागात काम करुन संबंधित बांधकाम व्यावसायिक वा विकसकांना अभय दिला आहे, त्या अधिकाऱ्यांची यादीच तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू केले आहे. यात विद्यमान शहर अभियंत्यांपासून विविध विभागात काम करणारे पाच अधिकारी पोलिसांच्या रडारावर आहेत. या अधिकाऱ्यांनी यापूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागात काम केले आहे. अर्थात महापालिकेचा नगररचना विभाग यापूर्वीपासूनच मलाईदार विभाग म्हणून ओळखला जातो. शहरातील विशिष्ट बांधकाम व्यावसायिक आणि विकसकांशी हातमिळवणी करत त्यांच्या सायीने या विभागात काम सुरु असते, असा पूर्वानुभव आहे. म्हाडा प्रकरणाने यावर शिक्कामोर्तब केला आहे. आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून संबंधित अधिकारी कमालीचे धास्तावलेले आहेत. पोलीस महापालिकेत कधीही चौकशीसाठी येऊ शकतात किंवा आपल्याला अटक करु शकतात या भीतीने संबंधित अधिकाऱी महापालिकेतून गायब होण्यात धन्यता मानत आहे. परिणामी त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. अनेक कामे प्रलंबित राहत असून अभ्यांगतही अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करतांना वैतागत आहेत.
_
दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक : म्हाडा जमीन फसवणूक प्रकरणात न्यायालयाने सोमवारी (दि.११) दोघांना वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले होते. पोलीस नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश आबाजी पाटील (वय ४३, रा. दत्त चौक, गंगापूर रोड, नाशिक) व भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन चंद्रकांत काजळे (वय ५५, रा. काळे नगर, आनंदवली, नाशिक) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांना पोलिसांनी ६ मे रोजी रात्री अटक केली होती.

0 9 7 1 3 7
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *