जलजन्य आजारावर नियंत्रणासाठी ” स्वच्छ जल से सुरक्षा ” अभियान प्रभावीपणे राबवा : जि . प . अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावीत

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
जलजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध होण्यासाठी ” स्वच्छ जल से सुरक्षा ” हे अभियान ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबवून जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे . तसेच जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ग्रामस्तरावर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावीत यांनी केले . जल जीवन सर्वेक्षण २०२३ अंतर्गत ” स्वच्छ जल से सुरक्षा “ या अभियानाचा शुभारंभ नंदुरबार जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या . यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे महिला व बालकल्याण सभापती संगीताताई गावीत , शिक्षण सभापती गणेश पराडके , कृषि व पशू संवर्धन सभापती हेमलता शितोळे , समाजकल्याण सभापती शंकर पाडवी , अति . मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , प्रकल्प संचालक ( DRDA ) आर.पी.पाटील , प्रकल्प संचालक ( जल जीवन मिशन ) जयवंत उगले , कार्यकारी अभियंता ( ग्रा.पा.पु ) . संजय बाविस्कर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं ) , जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी , कार्यकारी अभियंता ( लघुसिंचन ) , उपस्थित होते . जिल्ह्यात दि . १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबविण्यात येत आहे . अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे व नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगींग , पाणी गुणवत्ता परीक्षण , मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी गुणवत्ता परीक्षण , ग्रामस्तरावर ग्रामसेवक , आरोग्य सेवक , जलसुरक्षक , गाव स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या महीलां मार्फत पाणी नमुने गोळा करणे , पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करणे व त्याची माहिती संकेतस्थळावर अद्यावत करणे . तसेच एफ टी के किटची उपलब्धता , ग्रामपंचायतनिहाय प्रा.आ. केंद्र स्तरावरिल व त्याद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी या सर्व बाबी अभियान स्वरूपात दि .१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे . यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे व पाणी पुरवठा योजनांचे Geo Tag सह प्रयोगशाळेत तसेच ग्रामस्तरावर एफ टी के द्वारे विहीत मुदतीत 100 टक्के स्त्रोतांचे रासायनिक व जैविक तपासणी करुन घेण्याचे सर्व संबंधित विभागांना निर्देश दिले . याप्रसंगी ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक व ग्रामसेवक यांना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावीत व सर्व सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रासायनिक व जैविक एफ टी के किटचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितीन पाटील यांनी केले , तर सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले . आभार कैलास कांजरेकर यांनी मानले.
0 9 4 7 1 9
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *