केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्यानारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी अर्ज सादर करावे, असेआवाहन करण्यात आले आहे. यासाठी दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे.केंद्र शासनाच्यामहिला व बालविकास विभागातर्फे समाजात महिला सशक्तीकरण, समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचेकामात योगदान देणारी व्यक्ती, तसेच संस्थांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कारदेण्यात येतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान केला जातो.असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या सेवेची दखल घेऊन नारी शक्तीपुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरुपदोन लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे आहे. या पुरस्कारासाठी केवळ ऑनलाईन अर्ज करावेलागणार आहे. ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही. नामांकनासाठी पात्रता निकष हे पुरस्कारसर्व व्यक्ती आणि संस्थांसाठी खुले आहेत. वैयक्तिक श्रेणीच्या बाबतीत 1 जुलै 2022 रोजीपुरस्कार प्राप्त व्यक्तीचे वय किमान 25 वर्षे असणे आवश्यक आहे. जर अर्जदार संस्थाअसेल, तर तिने किमान 5 वर्षे सबंधित क्षेत्रात काम केलेले असावे. अर्जदार पूर्वी समानपुरस्कार प्राप्तकर्ता नसावा. उत्कृष्ट कार्यासाठी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केलाजाऊ शकतो, यात व्यक्ती, गट, सास्था, स्वयंसेवी संस्था आदी यांना महिलांच्या आर्थिकआणि सामाजिक सक्षमीकरणाच्या किंवा या बाबींशी संबधित किंवा अनुषंगिक अपवादात्मक परिस्थितीमध्येउत्कृष्ट कामगिरी केलेली असावी. निर्णय क्षमता, कौशल्य विकास, ग्रामिण भागातील महिलांनासोयी सवतली उपलब्ध करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, कला व संस्कृती, खेळ, महिला सुरक्षाआरोग्य, शिक्षण कौशल्य आदी बाबतीत महिला सक्षमीकरण करण्यासाठी केलेले योगदान याबाबतचाअनुभव असावा. साधारणपणे पुरस्कारमरणोत्तर दिले जाणार नाहीत. ज्या प्रकरणांमध्ये मंत्रालयाकडे मार्गदर्शक तत्वांमध्येनमूद केल्याप्रमाणे प्रस्ताव सादर केल्यानंतर मृत्यू झाला असल्यास अपवाद म्हणून पुरस्कारदिले जातील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदारानेअर्ज, नामानिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईनद्वारे केंद्र शासनाचे awards.gov.in या वेबसाईटवर दि.31 ऑक्टोंबर 2022 पुर्वी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकासअधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.0000000जन्म-मृत्यूचीनोंदणी संगणक प्रणालीवर करावी*जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांचे आवाहनबुलडाणा,दि. 12 : जिल्ह्यातील सन 2022 मधील जन्म-मृत्यू नोंदणी आणि जीवन विषयक आकडेवारी संबंधी जिल्हास्तरीयसमन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी एस. रामामुर्तीयांनी जन्म-मृत्यूची नोंदणी संगणक संकेतप्रणालीवरच करण्याचे निर्देश यावेळी दिले.बैठकीत जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी जन्म-मृत्यू नोंदीचे महत्व सांगितले. केंद्र शासनाच्या crsorgi.gov.in या संगणक संकेतप्रणालीवरचजन्म-मृत्यूची नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील जन्म-मृत्यूची नोंद या प्रणालीवरकरून नोंदणीचा वेग वाढविण्याचे आवाहन केले.प्रणालीचा उपयोगकरण्याचे सर्व निबंधक, ग्रामसेवक त्यांच्या निदर्शनास आणुन द्यावे. अद्यापही काही गावेजन्म व मृत्यूची नोंदणी याच प्रणालीवर करण्यात यावी. या प्रणालीचा यापुढे उपयोग करण्यातयावा. यासाठी दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. संग्राम प्रणाली,ई ग्राम सॉफ्टप्रणाली व म्यॅन्युअल पद्धतीने करतात, याची माहिती देण्यात यावी. ग्रामीणभागातील निबंधक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सन 2016 पुर्वी इतर पद्धतीने नोंदवलेल्याघटना वरील दिलेल्या संगणक प्रणालीवर घ्यावाचे आहेत. निबंधक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातीलसन 2016 नंतर संबधीत घटना नोंदणीसाठी crsogi.gov.in या संगणक प्रणालीचावापर सुरु ठेवावा. पंचायत समिती स्तरावर याबाबतच्या नोंदणीसाठी संनियंत्रण करण्यासाठीदर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे.जन्म-मृत्यूच्याबनावट संकेतस्थळापासून निबंधकांनी सावध राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.अशा बनावट संकेतस्थळापासून नागरिकांनी साधव राहावे, अशा आशयाचा सूचना फलक लावण्याचेबैठकीत सांगण्यात आले.000000 पशुमधील लंपी प्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवर गावात नियंत्रित क्षेत्र जाहीरबुलडाणा,दि. 12 : जनावरांमधील लंपी चर्मरोगाच्याप्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावांमध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यातआले आहे. पशुधनामध्ये गोव म्हैस या वर्गातील जनावरांना होणाऱ्या लंपी चर्मरोग या विषाणूजन्य त्वचा रोगाचा प्रादुर्भावआढळून आला आहे. या आजारामुळे जनावरांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी दुध उत्पादनकमी होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याबाबत जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त यांनी प्रस्ताव सादर केला आहे. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगासप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 12 व 13 अन्वये या नियंत्रण क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिघातजनावरांचे बाजार, वाहतुक, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढीलआदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.