सतीश पाटील तेजनकर लोणार : दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी मौजे वडगाव तेजन येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय,लोणार अंतर्गत राज्य पुरस्कृत सोयाबीन एकात्मिक प्रकल्पांतर्गत सदानंद पाटील तेजनकर यांच्या शेतात शेती शाळा आयोजित करण्यात आली होती . सदर प्रशिक्षणात सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजीव सिरसाट कृषी सहाय्यक यांनी केले व प्रास्ताविक श्री ज्ञानेश्वर नागरे कृषी सहाय्यक यांनी केले.सद्यस्थितीत सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅइक या रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढु नये म्हणून त्वरित उपाय योजना करण्यात यावेत म्हणून.पिवळे चिकट सापळे 15×30 सेंटीमीटर आकाराचे 20 ते 25 सापळे एका एकरात या प्रमाणात पिकाच्या समकक्ष उंचीवर सापळे लावण्यात यावेत.रोग /किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडींचा व्यवस्थापना करिता इमिडाक्लोरोप्रीड 17.8 एसाएल 2.5 मिली किंवा फ्लॉनिकामाईड 50% डब्ल्यूजी 3 ग्रॉम किंवा थायोमिथोक्झाम 25% डब्ल्यूजी 3 ग्रॉम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.गरज वाटल्यास पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी फवारणी करताना कीटकनाशके आलटून पलटून वापरावेत पायरेथ्रोईड कीटकनाशकाचा वापर टाळावा असे विविध कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन श्री राजीव सिरसाट सिरसाट यांनी केले.तर कीटकनाशके व तननाशक हाताळताना घ्यावयाची काळजी या विषयावर श्री किशोर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमामध्ये कृषी सहाय्यक नागरे यांनी कामगंध सापळे विषयी मार्गदर्शन केले. शरद वाघ कृषी सहाय्यक यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क वापरण्यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकर्यांच्या प्रश्नावली ला मार्गदर्शकानी भरपूर प्रतिसाद दिला. सरते शेवटी श्री राजीव सिरसाट यांनी उपस्थीत मान्यवर मार्गदर्शक आणि शेतकरी बांधव यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केलि.यावेळी गावातील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर ,जेसराज सिरसाट, शिवाजी सिरसाट,अनिल पवार,विशाल शिरसाठ,विजय मापारी,अमोल चेके,बाळू शिरसाठ,मनोहार शिरसाट,गजानन तेजनकर व इतर बरेच शेतकरी हजर होते.